Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA किती वाढणार, वेळेपूर्वी मोठा खुलासा!

7th Pay Commission DA Hike: केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी 2023 साठी डीए वाढवण्याची घोषणा अद्याप केलेली नाही.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी 2023 साठी डीए वाढवण्याची घोषणा अद्याप केलेली नाही.

मात्र, त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो, तो लवकरच 42 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

याचा फायदा 65 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यानंतर 1 जुलै 2023 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा वाढ होणार आहे.

AICPI निर्देशांकाच्या आधारावर वाढ होईल

ही वाढ कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आली आहे. डिसेंबरमधील घसरणीनंतर जानेवारीचा आकडा पुन्हा वाढला आहे. हा आकडा पाहिल्यानंतर येत्या जुलैमध्ये डीएमध्ये 4 टक्के वाढ होणार असल्याचे दिसते.

वास्तविक, जानेवारी ते जून या कालावधीतील AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे, जुलैमध्ये डीएमध्ये वाढ होईल. जुलै महिन्याची महागाई भत्ता वाढ अनेकदा सप्टेंबरमध्ये सरकारकडून (Government) जाहीर केली जाते.

AICPI 132.8 अंकांवर पोहोचला

डिसेंबर 2022 चा आकडा 132.3 अंकांवर होता. शेवटच्या दिवशी जाहीर झालेला जानेवारी 2023 चा आकडा 132.8 अंकांवर पोहोचला आहे.

आगामी काळात AICPI याच्या वर जाऊ शकते. अशा परिस्थितीत 1 जुलैपासून लागू होणार्‍या डीएमध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. जानेवारीनंतर येणार्‍या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे जुलैचा DA जाहीर केला जाईल.

डीए वर्षातून दोनदा वाढतो

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Employees) डीए (DA Hike) वर्षातून दोनदा वाढवला जातो. आता जानेवारी 2023 चा DA लवकरच जाहीर केला जाईल. यानंतर जुलै 2023 चा DA जाहीर केला जाईल.

डेटा कोण जारी करतो?

AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे ठरवले जाते? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्र आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT