7th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट; DA नंतर आता वाढली ग्रॅच्युइटीची लिमीट; जाणून घ्या

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता सरकारने ग्रॅच्युइटीच्या रकमेत मोठी वाढ केली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission News: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता सरकारने ग्रॅच्युइटीच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. 30 मे 2024 च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार (OM) 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 25 टक्क्यांनी वाढवून 20 लाख रुपयांवरुन 25 लाख रुपये करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2024 पासून ते लागू होईल. यापूर्वी, 30 एप्रिल 2024 रोजी हीच घोषणा करण्यात आली होती, परंतु 7 मे रोजी ती स्थगित करण्यात आली होती.

ग्रॅच्युइटीमध्ये वाढ

दरम्यान, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या दुरुस्तीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 20 लाख रुपयांवरुन 25 लाख रुपयांपर्यंत 25 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. आता मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. 30 मे रोजी, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व मंत्रालयांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमधील सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याची विनंती केली आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

नोकरदार लोकांना ग्रॅच्युइटी दिली जाते. ही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिली जाते. कंपनीत किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी दिली जाते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 नुसार, ही रक्कम त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर दिली जाते. ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने किमान पाच वर्षे एखाद्या संस्थेत काम करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT