Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA नंतर आता प्रवास भत्ताही मिळणार

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळून निघाली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळून निघाली आहे. केंद्र सरकारने या दिवाळीत कर्मचाऱ्यांना एकापाठोपाठ एक भेटवस्तू दिल्या असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. पूर्वी महागाई भत्ता वाढला होता आणि आता प्रवास भत्ता (टीए) देखील वाढला आहे.

दरम्यान, महागाई (Inflation) भत्त्यात वाढ झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या टीएमध्येही वाढ झाली आहे. मात्र आता प्रवासी श्रेणी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता राजधानी आणि दुरंतो एक्स्प्रेस व्यतिरिक्त तेजस ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. अलीकडेच महागाई भत्त्यात 4% ने वाढ करण्यात आली आहे. आता कर्मचार्‍यांचा (Employees) एकूण डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढला असून, डीएमध्ये (DA) वाढ झाल्याचा परिणाम टीएवर दिसून येत आहे.

प्रवास भत्ता लाभेल

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता केंद्रीय कर्मचारी त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर तेजस ट्रेनने प्रवास करु शकतील. सरकारने अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत प्रवासासाठी या ट्रेनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. वास्तविक, IRCTC ची तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी आणि प्रीमियम श्रेणीची ट्रेन आहे. वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर आता कर्मचारी त्यातून प्रवास करु शकणार आहेत.

TA गणना पाहा

वास्तविक, प्रवास भत्ता पे मॅट्रिक्स स्तराच्या आधारावर 3 श्रेणींमध्ये विभागलेला आहे. पहिली श्रेणी- हायर ट्रान्सपोर्ट अलाउन्स शहराचा आहे. यासाठी TA गणनेचे सूत्र, एकूण वाहतूक भत्ता = TA + [(TA x DA% )\/100].

कोणत्या श्रेणीमध्ये किती TA उपलब्ध आहे हे जाणून घ्या?

आता TA ची गणना कशी केली जाते याबद्दल बोलूया... या अंतर्गत TPTA ला 1-2 साठी 1350 रुपये, 3-8 स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी 3600 रुपये आणि वरील स्तर 9 साठी 7200 रुपये दिले जातात. या अंतर्गत लेव्हल 9 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना जास्त वाहतूक भत्ता असलेल्या शहरांसाठी 7,200 रुपयांचा TA + DA मिळतो. इतर शहरांसाठी हा भत्ता रुपये 3,600 +DA आहे. त्याच वेळी, 3-8 वर्षांपर्यंतच्या कर्मचार्‍यांना 3,600 अधिक DA आणि 1,800 अधिक DA मिळतो, तर स्तर 1 आणि 2 मध्ये, या श्रेणीतील प्रथम श्रेणीच्या शहरांसाठी 1,350 रुपये + DA, तर इतर शहरांसाठी 900. चा +DA मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT