Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission DA Hike: RJ, KA, DL नंतर झारखंडने दिली सरकारी कर्मचाऱ्यांना भेट

7th Pay Commission Latest Update: झारखंड सरकारच्या मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

DA Hike In Jharkhand: केंद्र सरकारने नवरात्रीत लाखो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता झारखंड सरकारनेही कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. झारखंड सरकारच्या मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही वाढ 1 जुलै 2022 पासून लागू होईल. वाढीव डीए कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये मिळेल, असा विश्वास आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांनाही तीन महिन्यांचा महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

एप्रिल 2022 मध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला

दुसरीकडे, कॅबिनेट सचिव वंदना डडेल यांनी सांगितले की, 'या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के झाला आहे. यापूर्वी, एप्रिल 2022 मध्ये, झारखंड (Jharkhand) सरकारने महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली होती.'

दुसरीकडे, कॅबिनेट सचिव वंदना डडेल यांनी सांगितले की, 'या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के झाला आहे. यापूर्वी, एप्रिल 2022 मध्ये, झारखंड सरकारने महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली होती.'

डिसेंबरपर्यंत मोफत रेशनची घोषणा

यापूर्वी, केंद्र सरकारने (Central Government) कर्मचाऱ्यांसाठीचा (Employees) महागाई मदत भत्ता (DR) 4% ने वाढवून 38% केला आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या ऑफिस मेमोरँडम (OM) नुसार, DR 38% पर्यंत वाढवण्यात आला आहे. तिसऱ्या नवरात्रीला (28 सप्टेंबर) पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेत डिसेंबरपर्यंत मोफत राशन देण्याची घोषणा करण्यात आली.

तसेच, कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या ऑगस्टमधील AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर आधारित, जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील आकडेवारीत 0.3 अंकांची वाढ झाली आहे. AICPI निर्देशांक जुलैमध्ये 129.9 होता, तो ऑगस्टमध्ये 130.2 वर पोहोचला आहे. या वाढीमुळे 65 लाख कर्मचाऱ्यांना जानेवारीत होणार्‍या महागाई (Inflation) भत्ता वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: बुधाची राहुच्या नक्षत्रात एन्ट्री, 'या' 3 राशींच्या बँक बॅलेन्सची गाडी सुस्साट; व्यापारात भरभराट अन् नोकरीत प्रमोशनचा योग

Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

SCROLL FOR NEXT