Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: मोठी बातमी, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 90,000 रुपयांची वाढ; 'या' दिवशी वाढणार DA!

DA Hike Latest News: तुम्हीही महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत असाल तर आतापासून पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: देशातील कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत असाल तर आतापासून पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

सध्या कर्मचार्‍यांना 38 टक्के दराने डीए वाढ मिळत आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए मिळेल. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या पगारात 90 हजार रुपयांची वाढ होणार आहे. याबाबतची माहिती कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून मिळाली आहे.

DA किती वाढेल?

कामगार ब्युरोकडून दरमहा जारी करण्‍यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे महागाई भत्ता मोजला जातो.

कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 साठी CPI-IW 31 जानेवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत औद्योगिक केंद्रांमधून घेतलेल्या CPI-IW आकड्यांवरुन DA ची गणना केली जाते. महागाई भत्त्यात 4.23 टक्के वाढ झाली आहे.

होळीनंतर अतिरिक्त पगार खात्यात येईल

मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीएमध्ये वाढीचा लाभ 1 जानेवारीपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार होळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा (Employees) डीए वाढवू शकते, म्हणजेच पुढील महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकतो.

पगारात 90,000 रुपयांची वाढ होऊ शकते

7 व्या वेतन आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ झाल्यानंतर, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 30,000 रुपये असेल तर त्याच्या एकूण पगारात सुमारे 10,800 रुपयांची वाढ होऊ शकते.

दुसरीकडे, जर आपल्याला सचिव स्तराबद्दल बोलायचे झाल्यास, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात 90,000 रुपये किंवा त्याहून अधिक वाढ होऊ शकते.

DA किती वेळा वाढतो?

सहा मासिक पुनरावलोकनांनंतर ACIPI क्रमांकांच्या आधारे DA वर्षातून दोनदा वाढवला जातो. होळीपूर्वी महागाई भत्त्याची वाढ होऊ शकते. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने देशातील 68 लाख ज्येष्ठ नागरिकांना आणि सुमारे 47 लाख कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीला सरकारने महागाई भत्ता 3 ते 4 टक्क्यांनी वाढवला, ज्यामुळे महागाई भत्ता 38 टक्के झाला. तीन टक्के पगारवाढ मिळाल्यावर महागाई (Inflation) भत्ता 41 टक्के किंवा 42 टक्के होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT