7th Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, पगारात झाली भरघोस वाढ; 'या' राज्यांकडून मिळाला दिलासा

Dearness Allowance Hike Updates: केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांची डीए/डीआर वाढ जुलै महिन्यात अपेक्षित आहे.

Manish Jadhav

Dearness Allowance Hike Updates: केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांची डीए/डीआर वाढ जुलै महिन्यात अपेक्षित आहे. केंद्राने शेवटच्या वेळी मार्चमध्ये डीए वाढवण्याची घोषणा केली होती, ती 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली होती. 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात अनेक राज्यांनी डीएच्या दरात बदल जाहीर केले आहेत.

दरम्यान, या राज्यांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळत आहे. या राज्यांनी मूळ वेतनावर डीएचा नवा दर लागू केला आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 60 दिवसांत कोणत्या राज्यांनी डीए वाढवण्याची घोषणा केली आहे?

तसेच, कर्नाटक सरकारने कर्मचार्‍यांसाठी डीएच्या दरात 4 टक्क्यांनी सुधारणा केली आहे. राज्यातील डीएचा दर 31 टक्क्यांवरुन 35 टक्के करण्यात आला आहे. नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) दर 31% वरुन 35% पर्यंत वाढवला आहे.

यूपीमध्ये डीए वाढला

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मे महिन्यात लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. UP सरकारने 1 जानेवारी 2023 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA आणि DR मध्ये 4% वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाढीनंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआरचा दर 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांवर पोहोचला आहे.

तामिळनाडूतही डीए वाढला आहे

तामिळनाडू सरकारने या महिन्यात राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवली आहे. 4% DA आणि DR ची वाढ सरकारने मंजूर केली आहे. DA मध्ये केलेला बदल 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. तामिळनाडूमध्ये महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आला आहे.

हरियाणात महागाई भत्ता वाढला

एप्रिल महिन्यातच 7व्या वेतन आयोगातर्गंत पगार मिळवणाऱ्या हरियाणाच्या (Haryana) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केला आहे. त्याची घोषणा एप्रिलमध्ये झाली.

हिमाचल आणि झारखंडमध्येही डीए वाढला आहे

हिमाचल प्रदेश आणि झारखंड सरकारने एप्रिलमध्ये डीए वाढवण्याची घोषणा केली. एप्रिलमध्ये झारखंड सरकारने डीए 34% वरुन 42% केला आहे. त्याचवेळी, हिमाचल प्रदेश सरकारने डीएमध्ये 3% वाढ केली आहे.

यानंतर तो 31% वरुन 34% पर्यंत वाढला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये DA वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू आहे, तर झारखंडमध्ये DA ची वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू आहे.

गुजरात सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अलीकडेच सातव्या वेतन आयोगांतर्गत राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए/डीआरमध्ये 8 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सरकारने (Government) डीएमध्ये केलेली 8 टक्के वाढ दोन भागांमध्ये लागू केली जाणार आहे. पहिले चार टक्के डीए 1 जुलै 2022 पासून लागू होईल. तर उर्वरीत 4 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT