7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी मोदी सरकार करणार मोठी घोषणा; पगारात होणार...!

DA Hike Latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. खरे तर, 31 मे रोजी संध्याकाळी केंद्र सरकार डीए स्कोअर जारी करणार आहे.
7th Pay Commission| Money
7th Pay Commission| MoneyDainim Gomantak
Published on
Updated on

7th Pay Commission DA Hike Latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. खरे तर, 31 मे रोजी संध्याकाळी केंद्र सरकार डीए स्कोअर जारी करणार आहे. या स्कोअरला AICPI निर्देशांक देखील म्हणतात.

या स्कोअरच्या आधारे जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवले जाईल. सध्या महागाई भत्ता 42 टक्के आहे, जो जानेवारीपासून लागू झाला आहे. तेव्हापासून महागाई भत्त्यात अडीच टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वेळी मार्चमध्ये डीए वाढीची घोषणा करण्यात आली होती

मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली होती. ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली.

आता महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा जुलैसाठी केली जाणार आहे, जी 1 एप्रिलपासून लागू मानली जाईल. सध्या सरकार (Government) 31 मे रोजी AICPI इंडेक्सचे आकडे जाहीर करणार आहे, जेणेकरुन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती वाढणार आहे याची कल्पना येईल.

7th Pay Commission| Money
7th Pay Commission: खूशखबर, खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA मध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

आता एप्रिल-मे-जूनचे आकडेही जोडले जातील

दरम्यान, सध्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, एकूण DA स्कोअर 44.46% वर पोहोचला आहे. आता त्यात एप्रिल, मे आणि जूनचे आकडेही जोडले जाणार आहेत.

यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी होणार आहे.

7th Pay Commission| Money
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा लागली लॉटरी! महागाई भत्त्यात बंपर वाढ

वाढत्या महागाईमुळे जनता हैराण झाली आहे

देशात महागाई गगनाला भिडली आहे. गेल्या 2 वर्षांपासून पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपये आहेत. त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या किमतींनीही नागरिक हैराण झाले आहेत.

या महागाईच्या तुलनेत लोकांचे उत्पन्न तितकेसे वाढत नाही. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Employees) काहीसा दिलासा मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com