Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून लागू होणार 'हा' नियम

Karnataka Budget: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच घोषणा करणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission Latest News Today: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच घोषणा करणार आहे. 1 जानेवारीपासून लागू होणारा हा महागाई भत्ता होळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यासाठी 6,000 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. याआधी सरकार (Government) 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू करणार असल्याची चर्चा होती.

नवीन आर्थिक वर्षापासून हा नियम लागू होणार आहे

सीएम बोम्मई यांनी सांगितले की, सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारातील बदलाचा अहवाल माजी मुख्य सचिव सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सादर करेल. 2023-24 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुरवणी अर्थसंकल्पात अतिरिक्त रक्कम दिली जाईल, असे सांगितले.

तसेच, सातव्या वेतन आयोगाचा अहवाल नव्या आर्थिक वर्षापासूनच लागू केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे मात्र, 1 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा करणाऱ्यांसाठी हा धक्का आहे.

5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

ते पुढे म्हणाले की, 'ही समिती अंतिम रिपोर्ट सादर करेल, ज्यावर सरकार तात्काळ अॅक्शन घेईल.' यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवली.

याशिवाय, शेतीशी संबंधित उपक्रमांसाठी गरजेनुसार कर्ज सुविधेची तरतूद करण्यात आली आहे. बोम्मई म्हणाले की, सरकारने 'भूश्री' या नवीन योजनेअंतर्गत 'किसान क्रेडिट कार्ड'धारकांना 2023-24 मध्ये 10,000 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT