Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: नवीन वर्षात 'या' दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी!

DA Hike in January 2023: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना नवीन वर्षासह आनंदाची बातमी मिळेल. होय, दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

DA Latest Update: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना नवीन वर्षासह आनंदाची बातमी मिळेल. होय, दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा वाढ केली जाते, त्यातील पहिली वाढ जानेवारीत आणि दुसरी जुलैमध्ये केली जाते. जुलैचा महागाई भत्ता सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. आता पुढील म्हणजे जानेवारीचा महागाई भत्ता मार्च 2023 पर्यंत अपेक्षित आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून होणार असली तरी.

डीएसोबत पेन्शनधारकांचा डीआरही वाढणार आहे

1 जानेवारीपासून लागू होणारा हा महागाई भत्ता मार्च महिन्यातील थकबाकीसह कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार यासोबतच पेन्शनधारकांच्या डीआरमध्येही वाढ करणार आहे. याशिवाय, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरकारने (Government) याचा साफ इन्कार केला आहे.

जानेवारी आणि जुलैमध्ये डीए वाढवला जातो

DA आणि DR वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो. गेल्या वेळी सप्टेंबरमध्ये 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळाला होता. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Employees) महागाई भत्ता 38 टक्के आहे. आता जानेवारीत 4 टक्क्यांच्या वाढीसह 42 टक्के होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता.

तसेच, Aicpi निर्देशांकात सातत्याने वाढ होत असल्याने 4 टक्के DA वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ते 132.5 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या Aicpi निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे मार्चमध्ये DA मध्ये वाढ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT