7th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता, 10 दिवसांनी वाढणार DA! आता किती वाढ होणार माहीत आहे?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फक्त आणखी 10 दिवसांची प्रतीक्षा बाकी आहे, त्यानंतर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फक्त आणखी 10 दिवसांची प्रतिक्षा बाकी आहे, त्यानंतर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

यावर बराच काळ चर्चा होत आहे, एआयसीपीआयने आतापर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावेळीही सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 4 टक्क्यांनी वाढ करणार आहे. सध्या मे आणि जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी असून, ते 30 जून रोजी जाहीर होणार आहेत.

10 दिवसांनंतर आकडेवारी जाहीर केली जाईल

सरकार (Government) यावेळी महागाई भत्त्यात किती वाढ करणार आहे हे 30 जून रोजी येणार्‍या आकडेवारीवरुन स्पष्ट होईल. याशिवाय यावेळी सरकार महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करु शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. AICPI निर्देशांकाचा आकडा 135 वर पोहोचला तर महागाई भत्त्यात नक्कीच वाढ पाहायला मिळेल.

DA 46 टक्के असू शकतो

दुसरीकडे, या महिन्यात हा आकडा 135 वर पोहोचला तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएमध्ये नक्कीच 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, त्यानंतर 42 टक्के दराने मिळणारा डीए 46 टक्क्यांवर पोहोचेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

महागाई भत्ता कशाच्या आधारावर वाढतो?

तसेच, महागाईचा दर लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ केली जाते. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही महागाई भत्त्यात वाढ केली जाते. महागाई जितकी जास्त तितका महागाई भत्ता जास्त.

कामगार ब्युरो कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची गणना करते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे केली जाते.

किती पैसे वाढतील

सध्या सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्यावर त्याला 42 टक्के महागाई भत्ता म्हणजेच 7560 रुपये मिळतात. पण महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढला, तर महागाई भत्ता दरमहा 8280 रुपये होईल. त्यानुसार दरमहा 720 रुपयांनी पगार वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT