Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास भेट, दरमहा 10,500 रुपयांनी वाढणार पगार! या दिवशी...

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते.

Manish Jadhav

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते. या बैठकीत जानेवारी 2023 च्या वाढीव DA वाढीला मान्यता दिली जाऊ शकते. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 महिन्यांच्या थकबाकीचे (DA Arrears) पैसेही येऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 10,500 रुपयांची वाढ होऊ शकते.

डीए 42 टक्के दराने मिळेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2023 मध्ये सरकार कर्मचाऱ्यांना (Employees) 42 टक्के दराने डीए देऊ शकते. कॅबिनेट बैठकीत सरकार वाढीव डीए जाहीर करु शकते. AICPI डेटावरुन मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो.

लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार

52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डीए मिळत आहे. यावेळी सरकारने (Government) 4 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.

10500 रुपये पगार कसा वाढणार?

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचार्‍यांच्या मूळ पगारावर डीएची गणना केली जाते. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार 25,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 42% DA नुसार दरमहा 10500 रुपयांची वाढ होईल. दुसरीकडे, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा 7560 रुपयांची वाढ होईल.

जुलैमध्येही महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता

कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास, महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जुलै 2022 मध्येही सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए आणि डीआर वाढीचा फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT