7th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: दिवाळीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट? डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता

महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे.

Pramod Yadav

7th Pay Commission: यावेळी दिवाळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते आणि या दिवाळीत त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ करु शकते.

दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते, पण आता याबाबत आलेल्या अपडेट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत मोठी भेट देऊ शकते. यावेळी डीए 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के (4% DA Hike) वाढ केल्यास, तो सध्याच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के होईल. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे.

मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतेही वक्तव्य किंवा अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दिवाळीत सरकार दुसरी डीए वाढ जाहीर करेल अशी कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे.

सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना 1 जानेवारी व 1 जुलैपासून दिला जातो. सन 2023 साठी, सरकारने पहिली दुरुस्ती करून 24 मार्च 2023 रोजी डीए वाढीची घोषणा केली होती आणि त्यानंतर 1 जानेवारी 2023 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे.

त्यानंतर केंद्राने कर्मचाऱ्यांना दिला जाणारा 38 टक्के डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के केला होता. आता सरकारने दिवाळीच्या दिवशी महागाई भत्ता वाढवला तर त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 पासून मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT