Nexo Hydrogen Electric Car Dainik Gomantak
अर्थविश्व

Hydrogen Electric Car: 700 किमी रेंज, 5 मिनिटांत होणार रिफिल; Hyundai ची जबरदस्त हायड्रोजन इलेक्ट्रिक कार लॉन्च

Hyundai Nexo Hydrogen Electric Car: Hyundai Nexo FCEV कारला 2.64 kWh क्षमतेचा बॅटरी देण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Hyundai Nexo Hydrogen Electric Car

कोरियातील सोल मोबिलिटी शोमध्ये Hyundai ने आपली नवीन अपडेटेड हायड्रोजन इलेक्ट्रिक कार 'Hyundai Nexo' लॉन्च केली. नेक्सो एक FCEV (फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल) कार आहे. या हायड्रोजन कारचे स्वरूप आणि डिझाइन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सादर केलेल्या इनिटियम संकल्पनेशी मिळतेजुळते आहे.

कारला समोरच्या बाजुला 'HTWO' LED हेडलॅम्प देण्यात आले आहेत. कारच्या स्टिअरिंग व्हीलवर डॉट्स देण्यात आले आहेत. खिडक्यांची डिझाइन चौरस पद्धतीची देण्यात आली आहे. यात एक जाड सी-पिलर देखील आहे जो बाजूच्या काचेला विभाजित करण्याचे काम करतो.

Nexo ला नव्याने डिझाइन केलेला डॅशबोर्ड देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12.3 इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम एकत्र जोडण्यात आले आहेत. केबिनला डिजिटल पद्धतीने प्रभावी बनवण्याचा कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.

यात 12-इंच हेड-अप डिस्प्ले आणि 14-स्पीकर बँग आणि ओलुफसेन साउंड सिस्टम देखील देण्यात आलीय. यासह, ब्रँड कॉलम-टाइप शिफ्टर, हवामान सेटिंग्जसाठी एक पातळ टच पॅनेल, एक वायरलेस स्मार्टफोन चार्जर, एक डिजिटल रीअर-व्ह्यू मिरर देखील दिला आहे.

Hyundai Nexo FCEV कारला 2.64 kWh क्षमतेचा बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी, ब्रँडने 147 hp हायड्रोजन इंधन सेल स्टॅक वापरण्यात आला आहे. कारमध्ये दिलेली इलेक्ट्रिक मोटर 201 hp चा पॉवर आउटपुट जनरेट करते.

कार केवळ 7.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते, असा कंपनीचा दावा आहे. हायड्रोजन साठवण्यासाठी कारमध्ये 6.69 किलो वजनाची टाकी देण्यात आली आहे. कार 700 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

हायड्रोजन कार रिफिल करणे आणि इलेक्ट्रिक कारपेक्षा फिरणे सोपे आहे. इलेक्ट्रिक कार डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज होण्यास किमान 30 मिनिटे लागतात. ह्युंदाईच्या या कारमध्ये हायड्रोजन रिफिल करण्यासाठी केवळ 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. यामुळे ही कार अधिक चांगली मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT