Airbag Feature Cars Dainik Gomantak
अर्थविश्व

Airbag Feature Cars: देशातील 90 टक्के कारमध्ये 6 एअरबॅगची सुविधा नाही

देशातील बहुतेक खरेदीदार अधिक एअरबॅगच्या पर्यायासह येणाऱ्या मॉडेलमध्येही स्वस्त व्हेरिएंटची मागणी करतात.

दैनिक गोमन्तक

भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या लाखो वाहनांपैकी केवळ काही निवडकांनाच 6 एअरबॅग मिळत आहेत. देशातील 10 टक्क्यांहून कमी कारमध्ये 6 एअरबॅग फीचर्सची सुविधा आहे. उर्वरित 90 टक्के वाहनांमध्ये एवढ्या एअरबॅग नसतात. सेफ्टी फिटर्स केवळ महागड्या वाहनांमध्ये (Cars) मिळतात.

* स्वस्त व्हेरियंटना अधिक मागणी

वाहन उद्योगाचे म्हणणे आहे की देशातील बहुतेक खरेदीदार अधिक एअरबॅगच्या पर्यायासह येणाऱ्या मॉडेल्समध्येही स्वस्त व्हेरिएंटची मागणी करतात. त्यामुळे देशात 100 हून अधिक एअरबॅग असलेल्या कारचा वाटा कमी आहे. देशात विकल्या जाणार्‍या कारमध्ये आता टू-एअरबॅग फिचर स्टॅडर्ड बनवले जात आहे.

* पूर्वी असे नव्हते

काही कंपन्या फक्त एक एअरबॅग असलेल्या कार विकत होत्या. नंतर सरकारने कारमध्ये 2 एअरबॅग (Airbag) असणे अनिवार्य केले आहे. यामुळे सर्व कार कंपन्यांना यावर्षी जानेवारी 2022 पासून अपग्रेड करणे भाग पडले आहे.

* नियम काय आहेत

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर 2022 पासून सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वाहन उद्योगातील एक वर्ग या नियमाच्या विरोधात आहे. त्याचबरोबर या आराखड्यावर अद्याप काम सुरू असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे.

* का आवश्यक आहेत

गाडी चालवताना अपघात झाल्यास समोरच्या सीटवर बसलेल्या लोकांच्या जीवाला धोका अधिक असतो. या अपघातांच्या धोक्यांवर मात करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी असलेल्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT