Har Ghar Tiranga Dainik Gomantak
अर्थविश्व

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत देशात 500 कोटी रूपयांचा व्यापार

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना देशात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्यापैकी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) ही एक मोहिम आहे. या मोहिमेंतर्गत देशात घरोघरी तिरंगा लावला जात आहे. दरम्यान, या मोहिमेंतर्गत देशात मोठ्या प्रमाणावर व्यापार देखील झाला असून, देशाअंतर्गत नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'च्या (CAIT/ कॅट) (Confederation of All India Traders) वतीने याबाबत माहिती जाहीर केली आहे. हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत देशात तब्बल 30 कोटी राष्ट्रिय ध्वजाची विक्री झाली असून, त्यापोटी 500 कोटी रूपयांचा व्यापार झाला असल्याची माहिती कॅटने प्रसिद्ध केली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून देशात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी झाला. देशात 3,000 हून अधिक ठिकाणी तिरंगा कार्यक्रम आयोजित केला होता. देशात मेक इन इंडिया अंतर्गत मागील वीस दिवसांत तीस कोटी तिरंगा ध्वज निर्माण करण्यात आल्याचे कॅटने म्हटले आहे.

दरम्यान, हर घर तिरंगा मोहिम देशात जाहीर केल्यानंतर अनेक स्थानिकांना यातून रोजगार मिळाला. स्थानिक शिंपी, उद्योगांनी तिरंगा निर्मितीत भाग घेतला. या मोहिमेत दहा लाखपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला असे कॅटने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT