2025 Skoda Kodiaq Dainik Gomantak
अर्थविश्व

2025 Skoda Kodiaq Launch: स्कोडा कोडियाक पॉवरफुल इंजिन अन् शानदार फीचर्ससह लॉन्च, एमजी ग्लोस्टर-टोयोटा फॉर्च्युनरला देणार तगडी टक्कर

2025 Skoda Kodiaq Launch in India: स्कोडा ऑटो इंडियाने शानदार कार लॉन्च करुन भारतीय मार्केटमध्ये मोठा गर्दा केला आहे. कंपनीने सेकंड जनरेशन '2025 स्कोडा कोडियाक' (2025 Skoda Kodiaq) लॉन्च केली.

Manish Jadhav

स्कोडा ऑटो इंडियाने शानदार कार लॉन्च करुन भारतीय मार्केटमध्ये मोठा गर्दा केला आहे. कंपनीने सेकंड जनरेशन '2025 स्कोडा कोडियाक' (2025 Skoda Kodiaq) लॉन्च केली. सात विविध रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केलेली ही नवीन अफलातून कार कंपनीने स्पोर्टलाइन आणि एल अँड के या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली. चला तर मग या एसयूव्हीची किंमत किती? कारमध्ये किती सीसीचे इंजिन आहे? आणि कोणत्या नवीन आणि प्रगत फीचर्ससह ही कार लॉन्च करण्यात आली ते सविस्तररित्या जाणून घेऊया...

डिझाइन

एक्सटीरियर

डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये नवीन बंपर, एलईडी हेडलॅम्प, 18-इंच अलॉय व्हील्स, सी-शेप एलईडी टेललाइट्स आणि रुफ रेल असे बदल दिसून येतील. नवीन ग्रिल आणि स्लीक एलईडी हेडलॅम्पमुळे या कारचा लूक पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम झाला आहे. मात्र साइड प्रोफाइलमध्ये कॅरेक्टर लाईन्सचा अभाव असेल, ज्यामुळे ही एसयूव्ही लांब दिसते. या कारची लांबी सुमारे 15 फूट 7 इंच आहे.

इंटीरियर 

या एसयूव्हीच्या इंटीरियरबाबत बोलायचे झाल्यास, प्रीमियम आणि सॉफ्ट टच मटेरियल देण्यात आले आहे, जो या सेगमेंटच्या कारमध्ये गरजेचा आहे. या कारमध्ये मसाजपासून ते अँबियंट लाइटिंग आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि कार प्लेपर्यंत अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. ड्रायव्हर सीट असो किंवा कारची तिसरी रो असो, चार्जिंगसाठी सर्वत्र सी-टाइप चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

स्कोडा कोडियाकचे फीचर्स

या कारमध्ये 12.9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, थ्री झोन ​​क्लायमेट कंट्रोल सिस्टम, पॅनोरॅमिक सनरुफ, फ्रंट सीट्समध्ये हीटिंग आणि व्हेंटिलेशन सिस्टम, मसाज फंक्शन, स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग सेकंड रो सीट, सबवूफरसह प्रीमियम 13 स्पीकर ऑडिओ सिस्टम असे नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टी फीचर्स

कंपनीने ही कार डिझाइन करताना ग्राहकांच्या (Customers) सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली आहे. या एसयूव्हीमध्ये 9 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. याशिवाय, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबलिटी कंट्रोल, अँटी-ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यासारख्या सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

इंजिन डिटेल्स

स्कोडा कोडियाक 2025 मध्ये कंपनीने 2.0 लिटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहेत, जे 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. हे शक्तिशाली इंजिन 201 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीमध्ये तुम्हाला जास्त गियर शिफ्टिंग जाणवणार नाही, परंतु या कारचे सस्पेंशन आणि ड्राइव्ह खूपच आरामदायी आहे. या कारमध्ये स्मूथ ड्राइव्ह, पॉवरफुल इंजिनपासून ते आरामदायीतेपर्यंत सर्व काही आहे.

2025 Skoda Kodiaq Price in India

दरम्यान, या कारच्या (Car) स्पोर्टलाइन व्हेरिएंटची किंमत 46 लाख 89 हजार रुपये (एक्स-शोरुम) निश्चित करण्यात आली आहे. पण जर तुम्ही या कारचा L&K व्हेरिएंट खरेदी केली तर तुम्हाला 48 लाख 69 हजार रुपये (एक्स-शोरुम) खर्च करावे लागतील. स्कोडाच्या या एसयूव्हीच्या मार्केटमधील एन्ट्रीने टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरची धास्ती वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT