PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत सरकारने दिली खूशखबर, जाणून घ्या कधी मिळणार पैसे?

7th pay commission DA Arrears Update: सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे पैसे ट्रान्सफर करणार आहे.

Manish Jadhav

18 Months DA Arrears Latest News: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बर्‍याच काळानंतर, 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर एक मोठी अपडेट आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे पैसे ट्रान्सफर करणार आहे. सरकारने लोकसभेत 18 महिन्यांच्या डीए थकबाकीची माहितीही दिली आहे.

यापूर्वी, सरकारने सांगितले होते की, कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या (Employees) रोखलेल्या महागाई भत्त्यातून सरकारला 34,402.32 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. 48 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना लवकरच डीएची थकबाकी मिळणार आहे.

3 हप्ते थांबवले

सरकारच्‍या (Government) बाजूने आतापर्यंत डीए थकबाकीबाबत एकमत झालेले नाही, परंतु 18 महिन्‍यांच्या डीए थकबाकीबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्‍याची शक्यता आहे. सरकारने महागाई भत्त्याच्या तीन हप्त्यांवर बंदी घातली होती. 2021 मध्ये, जून महिन्यात ते पुनर्संचयित केले गेले.

जुलैमध्ये डीएमध्ये पुन्हा वाढ होईल

नुकतीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली आहे. सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए मिळत आहे. याशिवाय, जुलै 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा वाढ करण्यात येणार आहे.

2 लाखाहून अधिक रुपये मिळतील

लेव्हल-13 अधिकाऱ्यांना या महागाई भत्त्यामधून 1,23,100 ते 2,15,900 रुपये मिळू शकतात. आणि लेव्हल-14 (पे-स्केल) साठी, DA थकबाकी रुपये 1,44,200 ते 2,18,200 रुपये असेल.

असे झाल्यास होळीच्या दिवशी 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होईल. डीए थकबाकीचे पैसे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सॅलरीच्या बँडच्या आधारे दिले जातात.

कर्मचारी सातत्याने मागणी करत आहेत

हा त्यांचा हक्क आहे, त्यांचे पैसे रोखू नयेत, अशी मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांची सातत्याने करत आहेत. थकबाकी भत्त्याच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दादही मागितली होती.

यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचार करण्यास सांगितले होते की, हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, तो फ्रीज केला जाऊ शकतो, पण थांबवता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT