सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी भारतीयांनी वेगवेगळे प्लॅन केले आहेत.
भारतातील या ५ ठिकाणी ३१ डिसेंबर जोरात साजरा होतो.
३१ डिसेंबर म्हणलं की डोळ्यामोर पहिलं नाव गोवा येतं. बीच पार्टीज, सेलिब्रेशन, शहरात गावांत केलेली रोषणाई लोकांना आकर्षित करते.
पुदुच्चेरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा एक अनोखा अनुभव देते. समुद्रकिनाऱ्यांवर थेट संगीत, नृत्य आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह पार्ट्या आयोजित केल्या जातात.
अंदमान निकोबार येथे हॅवलॉक बेट, नील बेट आणि पोर्ट ब्लेअरसारख्या लोकप्रिय ठिकाणी बोनफायर, संगीतासह बीच पार्ट्या आयोजित केल्या जातात.
नाईट क्लब किंवा रूफटॉप पार्टी, फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी मुंबई हे अद्भुत ठिकाण आहे.
दिल्ली हे एक असे शहर आहे जे उत्सव साजरा कसा करायचा हे जाणते. इंडिया गेट येथील फटाक्यांच्या आतषबाजीपर्यंत, दिल्लीमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे.