Sameer Amunekar
गोव्यात फिरताना आपल्या घरच्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत ते फार उपयोगी ठरतं.
गोव्यात बाईक रेंट सहज मिळते, पण गाडी घेताना RC, इन्शुरन्स, PUC तपासा. गाडी देणाऱ्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक नक्की ठेवा.
बाईक चालवताना हेल्मेट घालाच. हे केवळ नियमासाठी नाही, तर तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खूप गरजेचं आहे.
स्पीड लिमिट, सिग्नल्स आणि लेन नियम पाळा. गोव्यात पोलिसांची कडक तपासणी असते.
गोव्यात राहायचा प्लॅन असेल तर हाॅस्टेलमध्ये राहा, मात्र स्वताच्या वस्तूंची काळजी घ्या. मोबाईल, पर्स, कागदपत्रं सुरक्षित ठेवा. शक्यतो लॉकरचा वापर करा.
अनोळखी भागात शक्यतो दिवसा फिरा. रात्री एकट्याने किंवा निर्जन ठिकाणी जाणं टाळा.
गोवा पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि जवळच्या व्यक्तींचे नंबर फोनमध्ये आधीच सेव्ह ठेवा.