लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; नानोडा येथे घराला आग लागून सोन्या-चांदीसह रोख रक्कम जळून खाक

Nanoda house fire: नानोडा-बामणवाडा येथे उमेश कांदोळकर यांच्या घराला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

नानोडा-बामणवाडा येथे उमेश कांदोळकर यांच्या घराला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत घराचा काही भाग जळून खाक झाला असून कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, घरात लवकरच एक लग्नकार्य असल्याने कुटुंबीयांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, या आगीत लग्नासाठी खरेदी केलेले नवे कपडे, दागिने आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आनंदाचे वातावरण असलेल्या या घरात आगीमुळे सध्या शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com