Wayanad Landslide: केरळमध्ये पावसाचं थैमान, वायनाड दुर्घटनेत आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु
देशभरात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांपासून केरळसह किनारपट्टीतील राज्यात पावासाचा जोर कायम आहे. यातच, केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाच्या घटनेने हाहाकार उडाला. या दुर्घटनेत मोठी जीवीतहानी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 195 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 200 हून अधिक जण बेपत्ता आहेत. आपत्कालीन विभागाकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. मदतकार्यामध्ये भारतीय लष्कराचे जवान, राज्याचा आपत्कालीन विभाग, एनडीआरएफ गुंतले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे सांगितले जात आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील 11 जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.