Wall Collapses at Kundaim: कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळून ३ जण ठार

Ponda Kundaim: भर पावसात कुंडई औद्योगिक वसाहतीतील संरक्षक भिंत शेडवर कोसळून तीन कामगार ठार झाल्याची दुर्घटना घडली.

Kundaim Accident:

कुंडई औद्योगिक वसाहतीतील आस्थापनाची भिंत निवासी शेडवर कोसळून तीन कामगार ठार झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. या दुर्घटनेत मुकेशकुमार सिंग (वय ३८ वर्षे) बिहार, त्रिनाथ नायक (वय ४७ वर्षे) ओरिसा आणि दिलीप यादव (वय ३७ वर्षे) बिहार हे तीन कामगार ठार झाले. चौथा कामगार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. तिन्ही मृत जयंती कन्स्ट्रक्शन या आस्थापनात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. संरक्षक भिंतीला लागूनच ही पत्र्याची शेड उभारली होती. दुर्घटनेनंतर लगेच अग्निशामक दलाला कळवल्यानंतर त्यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी कामगारांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. म्हार्दोळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. मयतांच्या कुटुंबियांना या दूर्घटनेची माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. म्हार्दोळ पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Hotel Industry Crisis
Goa Theft
Goa Drug Case
Mapusa POCSO Court Verdict
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com