Vinesh Phogat: विनेश फोगटची याचिका कोर्टाने फेटाळली, पदकही हुकले!

Paris Olympics 2024: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला बुधवारी (14 ऑगस्ट) मोठा धक्का बसला. क्रिडा लवादाने तिची याचिका फेटाळून लावली.

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला बुधवारी (14 ऑगस्ट) मोठा धक्का बसला. क्रिडा लवादाने तिची याचिका फेटाळून लावली. तिने आपल्या याचिकेत संयुक्तरित्या रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. मात्र तिची ही मागणी फेटाळण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत विनेशचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. या अपात्रतेलाच विनेश हिने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट या क्रिडा लवादामध्ये आव्हान दिलं होतं. क्रिडा लवादाने विनेशच्या याचिकेवरील आपला निर्णय तीन वेळा राखून ठेवला होता. मात्र बुधवारी तिच्या या याचिकेवरील निर्णय तडकाफडकी जाहीर करण्यात आला. लवादाने विनेशची याचिका फेटाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Shack Policy Extension Petition
Govinda Sunita Ahuja Controversy
 Supreme Court Stray Dog Directions
Goa High Court Shivaji Maharaj statue
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com