Video: रेडेघाट–सत्तरी येथे रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग; परिसर प्रदूषित, घाणीचे साम्राज्य

Redeghat Sattari garbage: रेडेघाट–सत्तरी परिसरात अनेकजण बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याने हा भाग सध्या कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे.

रेडेघाट–सत्तरी परिसरात अनेकजण बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याने हा भाग सध्या कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. रस्त्याच्या बाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे येथील नदी देखील प्रदूषित झाली आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कचऱ्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते.

हा परिसर म्हाऊस पंचायतीच्या हद्दीत येतो. म्हाऊस पंचायतीतर्फे घरोघर कचरा गोळा करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच वाळपई नगरपालिकेतर्फेही दररोज कचरा संकलन केले जाते. मात्र तरीही अनेकजण जाणूनबुजून रेडेघाट परिसरात कचरा फेकत आहेत.

या ठिकाणी घरगुती कचऱ्यासह चिकन सेंटरचा वेस्टही टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘स्वच्छ भारत, सुंदर गोवा’ ही संकल्पना येथे केवळ नावापुरती उरली असून तिची पूर्णपणे वाट लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com