VIDEO: मडगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई; 7.4 किलो गांजा जप्त, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मडगाव रेल्वे स्थानकावर अमली पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला.

रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मडगाव रेल्वे स्थानकावर अमली पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 7.4 किलो गांजा जप्त केला असून त्याचे बाजारमूल्य लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने स्थानकावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली. यावेळी एका प्रवाशाच्या बॅगेत गांजाचे पाकीट लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, हा साठा गोव्यात विक्रीसाठी आणला होता की इतरत्र पाठवला जाणार होता, याचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com