VIDEO: "2027 च्या विधानसभा निवडणुकीचा हा केवळ ट्रेलर!" पणजी महानगरपालिकेच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

CM Pramod Sawant: पणजी महानगरपालिकेच्या (CCP) निवडणुकीत भाजप-बाबूश पुरस्कृत पॅनेलने मिळवलेला 27-3 असा दणदणीत विजय म्हणजे 2027 च्या विधानसभा निवडणुकीचा केवळ 'ट्रेलर' आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

पणजी महानगरपालिकेच्या (CCP) निवडणुकीत भाजप-बाबूश पुरस्कृत पॅनेलने मिळवलेला 27-3 असा दणदणीत विजय म्हणजे 2027 च्या विधानसभा निवडणुकीचा केवळ 'ट्रेलर' आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच विजय निश्चित असल्याचे ठामपणे सांगितले.

या निकालाने हे सिद्ध केले की, जनतेचा विश्वास आजही भाजपवरच आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे जनतेने नाकारले असून विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे भाजप पूर्ण बहुमताने विजय मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पणजीचा हा विजय भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा असून आगामी काळात राज्यभरात भाजप आपली पकड अधिक मजबूत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant RGP Crisis Statement
Goa Monsoon Preparedness
cm pramod swant
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com