Venzy Viegas: पर्यटन विधेयकावरून 'आप'ची भाजपवर टीका

Goa Tourism: पर्यटन विधेयकाला आपला पूर्णपणे विरोध असल्याचे गोव्यातील आम आदमी पक्षाने म्हटले आहे. हे विधेयक गोव्यासाठी पूरक नसल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मुद्यांचा उहापोह होत आहे. यातच, पर्यटन विधेयकाला आपला पूर्णपणे विरोध असल्याचे गोव्यातील आम आदमी पक्षाने म्हटले आहे. हे विधेयक गोव्यासाठी पूरक नसल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले. आप आमदार वेन्झी विऐगस यांनी पत्रकार परिषद घेऊन या विधेयकावरुन सरकारवर घणाघात केला. आम्ही या विधेयकास विरोध करतो असे विऐगस म्हणाले. येत्या अधिवेशनात या विधेयकावर आम्ही चर्चेची मागणी करणार असल्याचेही विऐगस म्हणाले. याशिवाय, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सरबर्न फेस्टिव्हलवरुनही आमदार विऐगस यांनी सरकारचा समाचार घेतला. आम्ही यंदा होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करतो असे ते म्हणाले. उत्तर किंवा दक्षिण गोव्यात आम्हाला कुठेच सनबर्न फेस्टिव्हल नको. ड्रग्ज पॅडलर, वेश्या व्यवसाय नको. राज्यात आधीच कायदा सुव्यवस्था कोलमडली, असे आमदार वेन्झी वेएिगस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com