आगामी मंत्रिमंडळात महिलांना निश्‍चित स्‍थान- दामू नाईक

Goa Women in Cabinet: राज्‍य मंत्रिमंडळातील रिक्त जागी महिला आमदाराची वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच शनिवारी आमदार संकल्‍प आमोणकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्‍याने भाजपच्‍या नारी सन्‍मान घोषणेबाबत संशय घेतला जात आहे.

पणजी: राज्‍य मंत्रिमंडळातील रिक्त जागी महिला आमदाराची वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच शनिवारी आमदार संकल्‍प आमोणकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्‍याने भाजपच्‍या नारी सन्‍मान घोषणेबाबत संशय घेतला जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक म्हणाले, ‘‘पुढील मंत्रिमंडळात महिलांचाही समावेश असेल. महिलांना योग्‍य सन्‍मान मिळेल. भाजप नेहमीच महिलांचा आदर करतो. भाजपने अनेक पदांवर महिलांना संधी दिली आहे.’’

पक्ष देईल ती जबाबदारी स्‍वीकारेन : दिव्या राणे

‘‘आमच्‍यासाठी पक्ष सर्वश्रेष्‍ठ आहे. पक्षाकडून ज्‍या जबाबदाऱ्या मिळाल्‍या आहेत, त्‍यांना मी पूर्ण न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. भविष्‍यातही पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी स्‍वीकारेन. प्रथमच निवडून आलेला आमदार या नात्‍याने मी विधानसभेत अनेक गोष्‍टी शिकत आहे’’, असे

डॉ. दिव्या राणे म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.