Maina Curtorim Custodial Assault Case: मायणा-कुडतरी मारहाण प्रकरण, आणखी 2 पोलिसांचे निलंबन

Maina Curtorim Assault Case: युवकांना ताब्‍यात घेऊन मारहाण करण्‍याच्‍या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांची सर्वत्र छी-थू होत असतानाच आणखी दोघांना निलंबित करण्‍यात आले.

युवकांना ताब्‍यात घेऊन मारहाण करण्‍याच्‍या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांची सर्वत्र छी-थू होत असतानाच आणखी दोघांना निलंबित करण्‍यात आले. समीर सुदिर (हवालदार) आणि पुंडलिक परीट (शिपाई) अशी त्‍यांची नावे आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची गोवा राज्य मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा दखल घेत दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक आणि मायणा-कुडतरी पोलिस निरीक्षक यांना १७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

दारूच्‍या नशेत आम्हाला नग्न करून बेदम मारहाण केली, अपमानास्पद वागणूक दिली, तंबाखू चघळून तोंडाचा वास घेण्यास भाग पाडले, मारहाणीचे मोबाईलवर चित्रीकरण केले, असे सनसनाटी आरोप मारहाण झालेल्‍या पीडित युवकांनी केले आहेत. ॲड. लिओना बार्रेटो यांनी पीडित युवकांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्‍यांनी वरील धक्कादायक आरोप केले. मारहाण करणाऱ्या पोलिसांनी फुटबॉल जर्सी परिधान केली होती, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com