Warning on Food Packets: चिप्स, बिस्किटे, चॉकलेट... आता पाकिटाच्या पुढील बाजूलाच दिसणार ठळक 'लाल इशारा'

Supreme Court Packaged Food Warning: चिप्स, बिस्किटे, चॉकलेट, पॅकबंद स्नॅक्स किंवा कोल्ड्रिंक खरेदी करताना आता ग्राहकांना त्यातील पोषक घटकांची माहिती अधिक सहजपणे समजू शकणार आहे.

चिप्स, बिस्किटे, चॉकलेट, पॅकबंद स्नॅक्स किंवा कोल्ड्रिंक खरेदी करताना आता ग्राहकांना त्यातील पोषक घटकांची माहिती अधिक सहजपणे समजू शकणार आहे. पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पाकिटाच्या पुढील बाजूला ठळक लाल रंगाचे इशारा चिन्ह लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) या व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांना त्यातील आरोग्याशी संबंधित धोक्यांची माहिती पॅकेटच्या समोरच मिळण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.