Sunburn Festival 2024: दक्षिण गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलला विरोध!

Sunburn Goa: स्थळ अद्याप निश्चित नसले तरी वेर्णा IDC किंवा बेतूलमध्ये सनबर्न होण्याची शक्यता - आमदार क्रूझ सिल्वा

गोव्यात दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाचा हा फेस्टिव्हल वादाचा मुद्दा बनला आहे. यावर अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. "ना दक्षिण ना उत्तर आम्हाला सनबर्न गोव्यातच नकोय. आम्हाला ड्रग पेडलर, वेश्या व्यवसाय नकोय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अगोदर कोलमडली आहे," असे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले.

गुजरातमध्ये चांगला विकास झालाय, तिथे सनबर्न हलविण्यात यावा. सनबर्न महोत्सवाला विरोध करणारा ठराव सर्व पंचायतींनी संमत करावा, अशी मागणी वकील राधाराव ग्रेसियस यांनी केली आहे. उत्तरेत होत असलेल्या सनबर्नमुळे निर्माण झालेल्या परिणामांच्या आम्हाला जाणीव आहे. दक्षिण गोव्यात आम्हाला त्याच गोष्टी नको आहेत. स्थळ अद्याप निश्चित नसले तरी वेर्णा IDC किंवा बेतूलमध्ये सनबर्न होण्याची शक्यता आहे. दक्षिणेत आम्ही सनबर्न होऊ देणार नाही. माझ्यासह सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याला विरोध करतील, असे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com