Bodgeshwar Jatra: श्री देव बोडगेश्वर चरणी लोटला जनसागर; 90 व्या जत्रोत्सवाला सुरवात

Shri Dev Bodgeshwar Jatra: रविवारी दुपारी १२ वा. श्रींचरणी श्रीफळ ठेवून पुरोहितांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर या जत्रोत्सवाला सुरवात झाला. पुरोहित जाश्वेत आपटे व आंचल आपटे यांनी धार्मिक विधी तसेच गाऱ्हाणे घातले.

Shri Dev Bodgeshwar Jatra 2025

म्हापसा: गोमंतकीयांचे श्रद्धास्थान तसेच भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव बोडगेश्वराच्या ९० व्या महान जत्रोत्सवाला रविवार (ता.१२) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी भाविकांचा अलोट महासागर लोटला. येत्या १९ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जत्रोत्सवाच्या पूजेचे यजमानपद देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी भूषविले. रविवारी दुपारी १२ वा. श्रींचरणी श्रीफळ ठेवून पुरोहितांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर या जत्रोत्सवाला सुरवात झाला. पुरोहित जाश्वेत आपटे व आंचल आपटे यांनी धार्मिक विधी तसेच गाऱ्हाणे घातले.

यावेळी म्हापसा शहरातील विविध देवस्थाने, संस्था, पोलिस, अग्निशमन दल व पालिकेतर्फे श्रींच्या चरणी फळांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. दुपारी धार्मिक विधी व आरती झाल्यानंतर देवदर्शन घेण्यास सुरवात झाली. तसेच भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, काल शनिवारी श्रीदेव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

भाविकांच्या रांगा

जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरस्थळी लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रींचे दर्शन घेतले.

फेरीत खरेदीसाठी गर्दी

जत्रोत्सवातील फेरीमध्ये यंदा हजारपेक्षा अधिक दुकानांची फेरी थाटली आहे. ज्यात मनोरंजनात्मक करमणुकीसह, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच घरगुती साहित्यांची, खाजे आदींची दुकाने सजली आहेत. खरेदीसाठी लोक गर्दी करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com