Sanquelim Burglary Attempt: साखळीत चोरट्यांचा डाव फसला, घरातील नागरिकांची सतर्कता; संशयित सीसीटीव्‍हीत कैद

Sanquelim: देसाईनगर-साखळी येथे शनिवारी मध्यरात्री एका घरात चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला.

साखळी: देसाईनगर-साखळी येथे शनिवारी मध्यरात्री एका घरात चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र संशयित चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे सव्‍वादोनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती तोंडावर मास्क लावून एका पोलिस कॉन्स्टेबलच्या घराबाहेर आल्या. त्यांचा वावर घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्य जागे झाल्याने त्यांचा डाव फसला आणि त्यांनी तेथून पळ काढला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com