डिचोली: शेकडो भाविकांच्या साक्षीत आणि भक्तीमय वातावरणात बोर्डे येथील प्रसिद्ध "होमकुंड" उत्सव बुधवारी मध्यरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा उत्सव पार पडला.
बोर्डे येथील होमकुंड उत्सवाला मोठी परंपरा आहे. बुधवारी रात्री श्रींचा कलश मंदिराबाहेर काढण्यात आला. कलश मिरवणूक झाल्यानंतर रात्री ११ वा. होमकुंड पेटविण्यात आले. नंतर वाजतगाजत देवीच्या कलशासह व्रतस्थ भक्तगण गावतड येथील पवित्र झरीवर जाऊन स्नान करून पुनःश्च वाजतगाजत होमकुंडस्थळी आले.
माघारी येताना भक्तगणांतर्फे श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्री ब्राह्मण, श्री वडेश्वर आदी देवतांचा भोवमान केला. होमकुंड स्थळी आल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता पारंपरिक कार्यक्रमांनुसार श्रींच्या कलशासहित व्रतस्थ भक्तगणांनी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आदी देवदेवतांचा जयघोष करीत रखरखत्या होमकुंडातून अग्नीदिव्य केले. श्रींचा कळस माथ्यावर घेऊन अवसारी मोडानेही अग्नीदिव्य केले.नंतर कौलोत्सव होऊन या उत्सवाची सांगता झाली. होमकुंड उत्सवावेळी अग्नीदिव्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.