'इंजिनियरांची कात पातळ करची पडटली' रोहन खवंटे यांचा इशारा

Porvorim flyover service road condition: सर्व्हिस रोडची झालेली दुरवस्था आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यावरून पर्यटन मंत्री आणि पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी संताप व्यक्त केला

पर्वरीतील उड्डाणपुलाच्या कामामुळे सर्व्हिस रोडची झालेली दुरवस्था आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यावरून पर्यटन मंत्री आणि पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या सूचना पाळल्या जात नसल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित इंजिनिअर आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी स्वतः पाहणी करून खाप्रेश्वर देवस्थानजवळील रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही काम न झाल्याने खवंटे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. "जबाबदार इंजिनिअर आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई व्हायला हवी. मी स्वतः दिगंबर कामत यांना या बेजबाबदारपणाबद्दल माहिती देणार आहे," असे खवंटे म्हणाले.

जर पुढील २ ते ३ दिवसांत हा रस्ता नीट झाला नाही, तर पर्वरीतील लोक रस्त्यावर उतरतील. रस्ता दुरुस्त होईपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची 'ट्रॅफिक डायव्हर्शन' (वाहतूक वळवणे) होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या समस्येचा पाठपुरावा करत असूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com