Goa News: बालरथ, स्कूलबशी आनी व्हॅन ड्रायव्हरांक पुलीस व्हेरिफिकेशन सक्तीचे

School Transport Staff Police Verification: आदेशात नमूद केलेले नियम सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व शाळांना लागू करण्यात आले आहेत.

राज्‍यात आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांच्या बस, व्हॅन आणि विशेषतः ‘बालरथ’ वाहनांवरील चालक आणि मदतनीसांसाठी पोलिस पडताळणी अनिवार्य केली आहे. यासंदर्भात शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी २९ डिसेंबर रोजी या संदर्भात सर्व शाळांना लेखी आदेश जारी केले आहेत.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत, मुलांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. या आदेशात नमूद केलेले नियम सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व शाळांना लागू करण्यात आले आहेत.

‘बालरथ’सह सर्व शालेय वाहतूक वाहनांवरील चालक, मदतनीस आणि अटेंडंट यांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक आहे तसेच ज्या चालक किंवा मदतनीसाकडे वैध पोलिस पडताळणी प्रमाणपत्र नसेल, त्यांना विद्यार्थी वाहतुकीच्या कामावर ठेवता येणार नाही, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com