Pernem Tambose: ऐन हंगामात रानडुकरांकडून शेती उद्ध्वस्त! पेडणे-तांबोशेत वाढला उपद्रव

Pernem Tambose Wild Boar Destroyed Rice Farming: तांबोसे-मोप-उगवे पंचायत क्षेत्रातील तांबोसे या गावातील पांडुरंग आसोलकर यांच्या भातशेतीचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याची दखल कृषी खात्याने घेऊन या भातशेतीची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पांडुरंग आसोलकर यांनी केली आहे.

Pernem Tambose Wild Boar Destroyed Field

मोरजी: तांबोसे-मोप-उगवे पंचायत क्षेत्रातील तांबोसे या गावातील पांडुरंग आसोलकर यांच्या भातशेतीचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याची दखल कृषी खात्याने घेऊन या भातशेतीची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पांडुरंग आसोलकर यांनी केली आहे. पेडणे तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पन्न घेत असतात; परंतु या पिकाची रानटी जनावरांकडून नासधूस केली जाते आणि या नुकसानाची कृषी खात्याकडून योग्य पद्धतीने दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोठ्या प्रमाणात रानटी जनावरे शेतीमध्ये घुसत आहेत. परंतु शेतकऱ्यांना सरकारकडून कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई वेळेवर मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेती व्यवसायाकडे न वळता शेती पडिक ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन रानटी जनावरांनी केलेली शेताची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com