पेडण्यात खळबळ! बागातवाडा-पालये येथे बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले; वन विभागाकडून तपास सुरू

Leopard Cub Found Dead in Pernem: पेडणे तालुक्यातील पालये येथील बागातवाडा परिसरात बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पेडणे तालुक्यातील पालये येथील बागातवाडा परिसरात बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक नागरिकांना झाडीच्या परिसरात बिबट्याचे पिल्लू पडलेले दिसून आले. संशय आल्याने त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पिल्लाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.

बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात बिबट्याचा वावर असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. वन विभागाने नागरिकांना कोणतीही अफवा पसरवू नये तसेच वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com