Panaji Election: बाबूश, भाजप एकत्र आल्याने सत्ता कायम! सडेतोड नायक VIDEO

Panaji municipal election result: दरम्यान, आमोणकर म्हणाले की, मंत्री बाबूश मोन्सेरात पुरस्कृत पॅनलचा विजय हा माझ्या मते आश्चर्यकारक नाही. कारण मागील एक वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू होती.

पणजी: ज्यावेळी मनोहर पर्रीकर होते, त्यावेळी देखील महानगरपालिकेत सत्ता ही बाबूश मोन्सेरात यांची असायची; त्यावेळीही मनोहर पर्रीकरांना त्यांना शह देणे जमले नव्हते. आता स्थिती अशी आहे की, मंत्री बाबूश मोन्सेरात आणि भाजपच्या विरुद्ध भाजप बी टीम म्हणजे उत्पल पर्रीकर अशी धारणा असल्याने महानगरपालिकेत मोन्सेरात आणि भाजपला मोठे यश मिळाले असल्याचे मत पणजीचे नागरिक आणि समाजसेवक संदीप हेबळे यांनी व्यक्त केले.

गोमन्तक टिव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात देविदास आमोणकर आणि नवनिर्वाचित नगरसेवक जॅक सुखिजा यांनीही सहभाग घेतला. दरम्यान, आमोणकर म्हणाले की, मंत्री बाबूश मोन्सेरात पुरस्कृत पॅनलचा विजय हा माझ्या मते आश्चर्यकारक नाही. कारण मागील एक वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू होती. प्रभाग बदल, आरक्षण असे अतिशय नियोजित कार्य करत हा विजय पदरी पाडून घेतला आहे.

आता ही वेळ आली आहे की, उत्पल पर्रीकर यांनी आपली भूमिका तळ्यात-मळ्यात अशी न ठेवता ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. उत्पल पर्रीकर यांचा एक पाय भाजपच्या दिशेने तर दुसरा वेगळ्या दिशेने ही भूमिका सोडून दिली, तर मतदार त्यांना निवडून देतील. पर्रीकर निवडून आले तर पुन्हा भाजपलाच मिळतील, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. या स्थितीचा राजकीय लाभ आणि प्रभाव मंत्री बाबूश मोन्सेरात यांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com