VIDEO: होली स्पिरीट चर्चमध्ये 'पाम संडे' उत्साहात! पवित्र आठवड्याला प्रारंभ

Palm Sunday: बायबलनुसार, या दिवशी येशू ख्रिस्तांचा जेरुसलेममध्ये प्रवेश झाला होता. त्यावेळी नागरिकांनी खजुरीची पाने दाखवत त्यांचे स्वागत केले होते. त्या स्मरणार्थ ‘पाम संडे’ साजरा केला जातो.

सासष्टी : ‘पाम संडे’निमित्त (झावळांचा रविवार) मडगाव तसेच परिसरातील चर्चमध्ये श्रद्धाभावाने कार्यक्रम पार पडले. हा ख्रिस्ती धर्मातील महत्त्वाचा सण असून तो ईस्टर संडेच्या एक आठवडा आधी साजरा केला जातो. याच दिवसापासून पवित्र आठवड्याची (होली वीक) सुरुवात मानली जाते.

बायबलनुसार, या दिवशी येशू ख्रिस्तांचा जेरुसलेममध्ये प्रवेश झाला होता. त्यावेळी नागरिकांनी खजुरीची पाने दाखवत त्यांचे स्वागत केले होते. त्या स्मरणार्थ ‘पाम संडे’ साजरा केला जातो.

मडगाव येथील होली स्पिरीट चर्चमध्ये पाम संडे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली तसेच विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. फा. मोविन फर्नांडिस यांनी उपस्थित ख्रिस्ती बांधवांना या दिवसाचे महत्त्व पटवून दिले.

राय येथील अवर लेडी ऑफ स्नोज चर्चमध्येही पाम संडे साजरा करण्यात आला. या ठिकाणी रेव्ह. फा. जानुआरियो डिकॉस्‍टा, फा. सावद व फा. पीटर यांनी प्रार्थना सभेत मार्गदर्शन केले. यानिमित्त उपस्थितांना खजुरीच्या (पाम) पानांचे वितरण करण्यात आले. एकूणच, पाम संडेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com