Nuvem: नुवेतील मेगा प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

Nuvem Mega Projects: नुवेतील मेगा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला असून आजपासून बेताळभाटी, माजोर्डा, नुवे येथील नागरिकांनी दोन लाख चौरस मीटर जागेवरील नियोजित प्रकल्पाला विरोधात आंदोलन केले.

नुवेतील मेगा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला असून आजपासून बेताळभाटी, माजोर्डा, नुवे येथील नागरिकांनी दोन लाख चौरस मीटर जागेवरील नियोजित प्रकल्पाला विरोधात आंदोलन केले.

या आंदोलनाला चिंबलवासीयांनीही पाठिंबा दिला असून गोविंद शिरोडकर यांनी मार्गदर्शन केले. एकजुटीने आंदोलन केल्यास सरकार प्रकल्प पुढे नेण्यास धजावणारी नाही, असेही शिरोडकर म्हणाले.

दोन लाख चौरस मीटर जागेवर भाजीपाला, फळबागेसाठी उपयुक्त असताना त्या जागेचे रूपांतर केले आहे. केवळ पंचायतीकडून ‘ना हरकत दाखला’ व तांत्रिक परवाना या केवळ दोन परवान्यांवर हे काम सुरु आहे. या जागेचे रूपांतरण केलेले सनद त्यांच्यापाशी किंवा इतर संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत, या जागेबद्दल वादही असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

या जागेत किती प्लॉट येणार व त्यात किती प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, याबाबत विचारणा केल्यास पंचायत व नगर नियोजन खाते एकमेकांना बोट दाखवतात. म्हणजेच यात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय असावा, असे ग्रामस्थांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
House Of Abhinandan Mega project Goa
Dele Villagers Protest
Karapur Mega Project Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com