94 जणांना अटक, 1 कोटी 92 लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त; ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले, पोलिसांची धडक कारवाई

North Goa Police Seize Drugs: उत्तर गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम तीव्र करत नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण ७४ गुन्हे दाखल केले आहेत.

उत्तर गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम तीव्र करत नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण ७४ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये आतापर्यंत ९४ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये २६ गोमंतकीय, ५४ बिगरगोमंतकीय आणि १४ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

पोलिसांनी या मोहिमेअंतर्गत सुमारे १,९२,७३,४२० रुपये किमतीचा एकूण ४९ किलो २२६ ग्रॅम २८० मिलीग्रॅम अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या बेकायदेशीर हालचालींवर कठोर कारवाई करण्यास पोलीस कटिबद्ध असून, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.