नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

Goa News: शेर्लेकर यांनी व्याघ्न अभयारण्याच्या मुद्यावरून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर भाष्य केले होते.

पणजी: आरटीआय कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना 'भाजप कार्यकर्ते वा पक्षावर टीप्पणी करू नका', असे बजावून धमकी दिल्याच्या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी भाजपचे नेते महानंद अस्नोडकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार काल गुरुवारी रात्री घडला. त्यानंतर शेर्लेकर यांनी पोलिस तक्रार दिली होती. आज सकाळपासून समाज माध्यमांवर ऑडिओ कॉल व्हारयल झाला.

शेर्लेकर यांनी व्याघ्न अभयारण्याच्या मुद्यावरून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर भाष्य केले होते. तो संदर्भ घेऊन शेर्लेकर यांना 'देशद्रोही' म्हणून धमकावण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

विजय, युरी यांची टीका

रामा काणकोणकर यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर भाजप नेत्याने शेर्लेकरांना धमकावले, असा संदर्भ घेत आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजप म्हणजे 'बाऊन्सर जनता पार्टी' अशी विजय यांनी संभावना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pakistan Independence Day Chaos Viral Video
Viral Video Cobra Bhaji Samosa Snacks
Grandmother First Flight Goa Trip Viral Video
Damu Naik NEET Paper Leak
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com