डिचोली तालुक्यातील नानोडा येथे थार एसयूव्ही आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नानोडा येथील रस्त्यावर एका भरधाव थार जीपने बसला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसमधील १४ प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून थारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोव्यातील महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.