Mulgao: गाव उद्ध्वस्त करणारा 'खाण व्यवसाय' नकोच! मुळगाव ग्रामसभेत लोकांची मागणी; राज्याबाहेरील NOC मुळे वातावरण तापले

Mulgao Mining: मुळगाव पंचायत क्षेत्रातील नियोजित प्रकल्प आणि राज्याबाहेरील एका व्यावसायिकाला दिलेली ''एनओसी'' हे विषयही ग्रामसभेत तापले.

Mulgao gram sabha mining opposition

डिचोली: मुळगावात पुन्हा एकदा खनिज प्रश्न ऐरणीवर आला. आज (रविवारी) झालेल्या पंचायतीच्या ग्रामसभेत मुळगाववासीयांनी पुन्हा खाणीला विरोध करताना गाव उद्ध्वस्त करणारा खाण व्यवसाय आम्हाला नकोच, अशी मागणी केली. गावाला काहीच फायदा नाही. उलट खाण व्यवसायामुळे गावावर संकट ओढवून घेण्यापेक्षा खाण बंद करा, असा ठराव आजच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला.

मुळगाव पंचायत क्षेत्रातील नियोजित प्रकल्प आणि राज्याबाहेरील एका व्यावसायिकाला दिलेली ''एनओसी'' हे विषयही ग्रामसभेत तापले. सरपंच आणि उपसरपंचांच्या राजीनाम्याची मागणीही पुढे आली. सरपंच मानसी कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुळगाव पंचायतीची ग्रामसभा आज पार पडली.

या ग्रामसभेला उपसरपंच गजानन मांद्रेकर यांच्यासह सर्व पंचसदस्य उपस्थित होते. पंचायत सचिव पुंडलिक गावस यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. या ग्रामसभेला सुमारे १०० लोक उपस्थित होते.

मुळगावातील खाण बंद करावी, असा ठराव माजी सरपंच वसंत गाड यांनी मांडला. हा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत झाला. खाणीवर धडक देण्यापूर्वी मुळगावच्या लोकांची एक बैठक घेऊन तसा निर्णय घ्यावा, असे वसंत गाड म्हणाले.

परराज्यातील व्यक्तीला एनओसी

मुळगाव पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एकमध्ये होऊ घातलेल्या एका प्रकल्पाचा विषयही ग्रामसभेत तापला. राज्याबाहेरील एका व्यावसायिकाला ‘एनओसी’ दिल्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com