Moira Assault: दुचाकीचा आरसा एकमेकांच्या स्कुटरला लागला; मयडे येथे दोन युवकांत मारामारी

Moira Assault: दोघेही आपापल्या दुचाकीवरून विरूध्द दिशेने जात होते.

दुचाकीचा आरसा एकमेकांच्या स्कुटरला लागल्यामुळे दोन युवकांत वाद झाला. त्यानंतर मारामारी झाली. ही घटना मयडे येथे बुधवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. या मारामारीत वालरॉय डायस (रा. कालीझर मयडे) व पुरूषोत्तम वेर्लेकर (रा. आताफोंड-मयडे) हे दोघेही जखमी झाले.

तर वालरॉय डायस याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. हा प्रकार मयडे पंचायत घराजवळील अंतर्गत रस्त्यावर घडला. वरील दोघेही आपापल्या दुचाकीवरून विरूध्द दिशेने जात होते.

अरुंद रस्त्यामुळे त्यांच्या दुचाकींचा आरसा एकमेकांच्या गाडीला लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांच्यात शिवीगाळ होऊन हाणामारी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com