Bhoma Highway: महामार्ग रुंदीकरणात एकाही मंदिराचा चिरा हलणार नाही! 'भोम'वासीयांना मंत्री गावडेंचे आश्वासन

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडे यांनी येथील सातेरी देवी नारायण देव, महादेव देव तसेच सटी देवीच्या मंदिरांचा एकही चिरा हलणार नाही, असे अभिवचन देऊन तळ्याचे संवर्धन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले.

Govind Gaude About Bhoma Highway

फोंडा: भोम येथील वादग्रस्त चौपदरी रस्त्यासंबंधी तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवारी) प्रियोळ येथील आमदार कार्यालयात झालेल्या बैठकीत या रस्त्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक आमदार तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी येथील सातेरी देवी नारायण देव, महादेव देव तसेच सटी देवीच्या मंदिरांचा एकही चिरा हलणार नाही, असे अभिवचन देऊन तळ्याचे संवर्धन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. विशेष म्हणजे स्थानिकांनी या चर्चेत भाग घेतला. दरम्यान, बैठकीतील काहीजण उठून गेले पण जे उपस्थित राहिले त्यांनी होकार दिल्याचा दावा मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे.

या बैठकीला स्थानिक आमदार तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यासह भोम अडकोणचे सरपंच दामोदर नाईक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते. भोम गावात बगल रस्ता का हवा आहे, कमानीवरील रस्ता का नको, यासंबंधीचे स्पष्टीकरण गोविंद गावडे यांनी मागितले असता, त्यावर चर्चा झाली. चौपदरी रस्ता बांधताना फक्त चारच घरे जाणार असून त्यांचे पूनवर्सन करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम खात्याने ठेवली आहे.मात्र भू संपादन झाले, त्याचे पैसेही जाहीर झाले आहेत, त्याचे काय, यावर, ती सरकारी प्रक्रिया असल्याचे गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bison Attack Death Betoda Goa
Ramesh Tawadkar And Govind Gaude Patch up
Goa Dinesh Gawade Death Case
Goa Assembly Protest Chargesheet:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com