Margaon Fire News: मडगावात आगीचे तांडव; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

Fire Accident in Goa: ला फ्लोअर हॉटेलसमोरील चाळीला अचानक आग लागल्याने सगळीकडे खळबळ उडाली

मडगाव: खारेबांद मडगावात बुधवार (दि.९ एप्रिल) च्या दिवशी दुपारी एक विचित्र प्रसंग घडला. ला फ्लोअर हॉटेलसमोरील चाळीला अचानक आग लागल्याने सगळीकडे खळबळ उडाली. ही आग नेमकी कशामुळे लागली असेल याचा अजून सुगावा लागलेला नाही, मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच पावलं उचलल्याने आग नियंत्रणात आली.

या चाळीत आग लागलेल्या वेळी अनेक महिला आणि लहान मुलं होती आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी सर्वात आधी मोहीम हाती घेण्यात आली. या चाळीला आग कशी लागली हे समजलं नाही मात्र कुणाची जीवितहाती होऊ न दिल्याची माहिती दीपाली सवाल (काउन्सिलर) यांनी माध्यमांना दिली. सर्वात आधी महिला आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर पुरुषांनी जमेल तेवढे सिलिंडर बाहेर काढण्यात यश मिळवलं.

कुंककाळी आणि फोंडा येथून मदतीला आलेल्या अग्निशमन दलांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यास मदत मिळाली अशी माहिती योगीराज कामात यांनी दिलीये. कलेक्टर ऑफिसमधून आता नुकसानग्रस्तांची मदत केली जाणार आहे. तिसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने भीषण आग लागूनही कुणाला जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com