MApusa: म्हापशात पार्किंगवरून पर्यटक-स्थानिकांत राडा Watch Video

Mapusa Parking Dispute: म्हापसा टॅक्सी स्टँड परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कर्नाटकचे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

म्हापसा टॅक्सी स्टँड परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कर्नाटकचे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून आलेले काही पर्यटक म्हापसा टॅक्सी स्टँडवर शीतपेय घेण्यासाठी थांबले होते. तिथे स्थानिक गाडी पार्क केली होती. ही गाडी मागे घेण्याच्या कारणावरून पर्यटकांचा तिथल्या स्थानिकांशी वाद झाला.

सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची पाहता पाहता विकोपाला गेली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने परिसरात काही काळ तणाव पसरला होता. अखेर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणून सार्वजनिक शांततेचा भंगप्रकरणी दोन्ही बाजूंच्या संबंधितांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

together for mhapsa complaint samuel braganza suicide case
Mapusa Youth Suicide
Mapusa Municipality
Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com