Mapusa Dengue Cases: चिंताजनक! म्हापसात जानेवारीपासून डेंग्यूचे आढळले 29 रुग्ण
राज्यात एककीकडे पावसानं थैमान घातलं असताना दुसरीकडे, रोगराई वाढत आहे. म्हापसामध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत डेंग्यूचे 29 रुग्ण आढळले आहेत. म्हापसात डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. डासांच्या वाढलेल्या संख्येमुळे डेंग्यू, मलेरिया आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे.
दरम्यान, अनेकदा डासांची पैदास रोखण्यासाठी काहीजण परस्पर किटकनाशकांची फवारणी करतात. मात्र, अधिकतर ही फवारणी रासायनिक असतात. त्यामुळे यापुढे अशी फवारणी करतेवेळी आधी आरोग्य केंद्रास कल्पना देणे आवश्यक आहे. कारण घातक रासायनिक फवारणीमुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फवारणी ही आरोग्य केंद्रास विश्वासात घेऊनच प्रत्येकाने करावी, अशी सूचना आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.